Vijayapura

शिलाई काम करणाऱ्या युवकाने साकारली केदारनाथ प्रतिकृती

Share

१४ विद्येचा अधिपती असलेल्या श्री गणेशाच्या उत्सवात अनेक कलाकार आपली कला सादर करतात, विजापूरमधील एका युवकानेही आपल्या कलेचे सादरीकरण करून श्रीभक्तांची वाहवा मिळविली आहे. शिलाई काम करणाऱ्या युवकाने चक्क केदारनाथ प्रतिकृती बनवून आकर्षक अशी आरास तयार केली आहे.

व्यवसायाने शिंपी असलेल्या विजापूरमधील १८ वर्षीय युवकाने विजापूर शहरात असलेल्या दर्ग्यानजीकच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गणेशोत्सवासाठी आकर्षक अशी केदारनाथच्या प्रतिकृती उभी केली आहे. शंकर सुरेश पुजारी नामक या युवकाने साकारलेली हि काळाकुटी श्री भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. मागील वर्षी अयोध्या राम मंदिरच्या धर्तीवर प्रतिकृती तयार करण्यात आली होती. आणि यंदा उत्तराखंड येथील श्री केदारनाथ देवस्थानाच्या धर्तीवर प्रतिकृती साकारण्यात आली आहे. देवस्थानाच्या मागील बाजूस बर्फाचा डोंगर, समोर केदारलिंग अशा पद्धतीची हि प्रतिकृती थेट केदारनाथच्या दर्शन घडवून आणते. हि सजावट पाहण्यासाठी श्रीभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. सदर प्रतिकृती १० फूट रुंद आणि ७ फूट उंच आकाराची असून संपूर्ण प्रतिकृती हि थर्मोकोलमध्ये बनविण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, संगीत, रंगीबेरंगी आरास लक्षवेधी ठरत आहे. मागील वर्षी गणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या श्री राम मंदिर प्रतिकृतीला माजी मंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील महामंडळाने प्रथम क्रमांकाने गौरविले होते. हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक असलेल्या श्री गणेशोत्सवात केला आणि प्रतिभा बाहेर आणण्यास मदत करतात. विजापूरमध्ये साकारण्यात आलेले केदारनाथ देवस्थान हे श्रीभक्तांचे लक्ष वेधून घेत असून पहिल्याच दिवसापासून हि कलाकृती पाहण्यास भाविकांची गर्दी होत आहे.

Tags:

CRIME ATHANICRIME POLICE