Belagavi

अलोककुमार यांची बेळगावातील उत्सव मंडळांना भेट

Share

गणेशोत्सवासाठी काउन्ट डाउन सुरू झाल्याने अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी आज बेळगाव शहराचा दौरा केला. त्यांनी विविध गणेश मंडळांची भेट घेऊन गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.

होय, बेळगावात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मात्र यंदा शहरातील गणेश मंडळांनी कोरोना हटल्याने भव्य प्रमाणात, जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली आहे. त्यामुळे एडीजीपी आलोक कुमार यांनी मंगळवारी स्वतः बेळगावात येऊन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या चव्हाट गल्ली व जवळच्या संवेदनशील परिसराला भेट देऊन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, गणेश मंडपात उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी एडीजीपी अलोककुमार यांचे स्वागत करून गणेशोत्सवाबाबत माहिती दिली. आम्ही शिवजयंती अतिशय शांततेत साजरी केली. गणेशोत्सवही असाच साजरा करणार आहोत. पोलिसांनीही वाहतूक सुरळीत केली आहे. सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता गणेशोत्सव साजरा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर एडीजीपी अलोककुमार यांनी जालगार गल्लीमार्गे खडक येथील गणेश मंडळाला भेट दिली. यावेळी विजय जाधव, राहुल जाधव, संजय जाधव आदींशी चर्चा केली. आम्ही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत. पोलिसही आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व प्रकारची व्यवस्था करण्याची विनंती केली. यावेळी अलोककुमार यांनी गणेश मंडपात आलेल्या दोन मुस्लीम मुलांशी गप्पा मारल्या. त्यांना तुम्ही इथे का आलात, अशी विचारणा केली. त्यावर त्या मुलांनी आम्ही  गणपतीसाठी आलो आहोत, असे उत्तर दिले. अलोककुमार यांनी त्या मुलांचे कौतुक करून नीट अभ्यास करा अशी सूचना केली. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताबा एडीजीपी अलोककुमार म्हणाले की, कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा केला गेला नाही. यावेळी कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. याबाबत पोलीस विभागाने पुरेशी तयारी केली आहे. आमचे अधिकारी आधीच तयारी करत आहेत. बेळगावात जलद कृती दलही उतरणार आहे. 7व्या दिवसापासून ते 11व्या दिवसापर्यंत रॅपिड ऍक्शन फोर्सची टीम बेळगावात सुरक्षा पुरवणार आहे. गणेशोत्सवादरम्यान शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव शहरावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. राखीव पोलिस आणि होमगार्ड आधीच सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गणेशोत्सवादरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह पोलिस स्टेशन स्तरावर व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दैनंदिन घडामोडी व सूचना याद्वारे दिल्या जातात. यासंदर्भात स्वयंसेवकांसाठी मार्गदर्शन यंत्रणाही करण्यात आली आहे. बेळगाव झोनमध्ये सर्वत्र शांतता समितीच्या बैठका झाल्या आहेत. गणेशोत्सव काळात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलिस विभागाने या संदर्भात बरीच तयारी केली आहे असे एडीजीपी अलोक कुमार यांनी सांगितले.

यावेळी आयजीपी सतीश कुमार, शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, एसपी डॉ. संजीव पाटील, डीसीपी रवींद्र गडादी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, एसीपी नारायण बरमणी, एसीपी सदाशिव कट्टीमणी, एसीपी चंद्रप्पा आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. यानंतर एडीजीपी अलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात पोलिसांनी पथसंचलन केले.

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews