Belagavi

केएलएस आयएमआर येथे वार्षिक क्रीडामहोत्सवाचे उदघाटन

Share
  • बेळगावमधील के एल एस मधील आयसीएमआर कॅम्पसमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत ‘स्पिरिट २०२२’ क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.व्हॉइस : या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन मंगळवारी केएलएसच्या आय सी एम आर कॅम्पसमध्ये करण्यात आले होते. २६ ते २९ ऑगस्ट या कालावधीत अनेक क्रीडा स्पर्धा क्रीडामहोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आल्या होत्या. एमबीए प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ तसेच फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, कबड्डी आणि इंटरनेट गेम यासारख्या अनेक क्रीडास्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आकर्षक पथसंचलन करून मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केएलएस आयएमईआर संचालक डॉ. आरिफ शेख यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. केएलएस आयएमईआर अध्यक्ष आर एस मुतालिक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावून देत प्रोत्साहन दिले. ()

    यावेळी शारीरिक शिक्षक जॉर्ज राड्रिग्ज, क्रीडा संयोजक श्रीकांत नायक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या समारंभास मिस आकांक्षा नेवगी आणि प्रतीक्षा मन्नोळकर यांचीही उपस्थिती होती.

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews