बेळगाव शहरात गणेशोत्सवादरम्यान सावरकरांसह कोणत्याही नेत्यांची छायाचित्रे लावण्यापूर्वी स्थानिक प्रशासकीय संस्थांची परवानगी घेणे बंधनकारक आहे असे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले.
शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज, मंगळवारी बेळगावात आलेले एडीजीपी अलोक कुमार यांनी बेळगावला भेट दिली. शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्हा पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.
दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान मंडपात सावरकरांचे छायाचित्र लावण्याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर दिले. वैयक्तिक जागेत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली तर तेथे संबंधितांना हरकत नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना केल्यावर अशा प्रकारे कोणाचेही छायाचित्र लावता येत नाही. त्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घ्यावी लागते असे त्यांनी सांगितले. बाइट
दरम्यान, श्रीराम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी सावरकरांच्या छायाचित्राला हात लावला तर त्यांचा हात कापून टाकू, असे प्रक्षोभक विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना एडीजीपी अलोककुमार म्हणाले, प्रत्येकजण जे काही बोलतो त्या सगळ्यावर तुम्ही बसून टिप्पणी करू शकत नाही. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून ते बोलतात. काही कायदेशीर बोलतात. तर काही कायद्याच्या बाहेर बोलतात. आम्ही त्या सर्वांवर भाष्य करू शकत नाही.
याचवेळी डीजेच्या वापराबाबत प्रसार माध्यमांच्या प्रश्नावर, डीजेच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. डीजे आणि साउंड बॉक्सचा वापर करताना मंडळांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करावे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे एडीजीपी अलोककुमार यांनी सांगितले.
राज्यातील पीएसआय भरती घोटाळ्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना एडीजीपी अलोककुमार म्हणाले, मी पीएसआय भरती घोटाळ्याबद्दल बोललो नाही. गोकाक पोलीस कॉन्स्टेबल भरतीतील घोटाळ्याबाबत मी सांगितले. आता याच आरोपींचा केपीटीसीएल परीक्षेत सहभाग असल्याची तक्रार आली होती. या संदर्भात आमचे एसपी आधीच तपास करत आहेत. या प्रकरणी यापूर्वीही अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी मी कॉन्स्टेबल परीक्षेबद्दल बोललो. पण मी पीएसआय भरती परीक्षेबद्दल बोललो नाही असे एडीजीपी अलोककुमार यांनी सांगितले.
या प्रसंगी एसपी डॉ. संजीव पाटील, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments