Vijayapura

विजापुरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी :आप्पासाहेब पट्टणशेट्टी

Share

यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी दिली.

विजापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, विजापूर शहरातील शिवाजी सर्कल येथील गणेशोत्सव मंडळातर्फे आज भव्य श्रीमूर्ती आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा गणेशोत्सवासाठी १५० मंडळांना मातीपासून बनविलेल्या श्रीमूर्ती आणि दोन हजार हुन अधिक लहान श्रीमूर्तींचे वितरण मोफत करण्यात येणार आहे.

याचप्रमाणे गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार केला जाणार आहे. पुण्याच्या संघर्ष ढोल ताशा पथकाचाही या सोहळ्यात सहभाग असेल, असे ते म्हणाले. गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी सकाळी ११ वाजता शिवाजी सर्कल पासून भव्य मिरवणुकीचे आयोजन केले असून ऐतिहासिक ताज बावडी येथे गणेशमूर्ती विसर्जित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

याचप्रमाणे ताज बावडी येथे विसर्जन करण्याचा आग्रह त्यांनी उचलून धरत परंपरेनुसार ताज बावडीत गणेश मूर्ती विसर्जित करण्याच्या निर्णयावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा विद्यमान आमदारांनी दिला आहे. शिवाय गुंडा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. शांतता भंग करण्याचा आमचा कोणताही हेतू नसून पोलीस विभागाने याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणीही अप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी केली. ()

Tags: