गुजरातमधील बिल्किस बानू प्रकरणी केलेल्या 11 आरोपींच्या सुटकेचा निषेध करण्यासाठी बेळगावात विविध संघटनांनी आंदोलन छेडत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
गुजरातमधील बिल्किस बानूवर झालेला बलात्कार आणि तिच्या कुटुंबियांची केलेली हिंसा हे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारे प्रकरण आहे. या प्रकरणात तुरुंगात गेलेले सर्व ११ आरोपी पॅरोलवर सुटले आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवावे, या मागणीसाठी विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. निषेधाचे फलक हातात घेऊन आंदोलकांनी बिल्किस बानोच्या मृत्यूला न्याय मिळावा या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी किरण बेदी नामक आंदोलकाने प्रतिक्रिया देताना सांगितले कि, आम्ही कोणत्याही जाती-धर्माच्या विचारावर लढत नसून आम्ही भारतीय नागरिकांवरील हिंसाचार आणि बलात्काराचा निषेध करण्यासाठी आवाज उठवत आहोत. पाशवी बलात्कार करून एका लहान मुलाला आणि आईला क्रूर वागणूक दिली. हा हिंसाचार असाच वाढत राहिल्यास भविष्यात अडचणी निर्माण होतील, बिल्किस बानूवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आपण करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.,
सुधील व्ही नामक आंदोलनकर्त्या महिलेनेही या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, सदर आरोपींची करण्यात आलेली सुटका हि निषेधार्थ असून सदर आरोपींची सटका केल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला हि बाब देशाला कोणता संदेश देते? मुलींच्या, महिलांच्या संरक्षणासाठी कोणता संदेश यातून मिळतो याचा विचार करून त्या ११ आरोपींना पुन्हा कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी तानाजी सावंत, सीमा इनामदार, सुनीता देसाई, मुख्तार इनामदार, मिलिंद पेडणेकर, मोहनगौडा पाटील, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि लैंगिक अल्पसंख्यांक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments