Belagavi

हुक्केरी हिरेमठच्या शाखेत श्री वीरभद्रेश्वर जयंती

Share
  • बेळगावातील लक्ष्मी टेकडी येथील हुक्केरी हिरेमठच्या शाखेत श्री वीरभद्रेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

    सकाळी वीरभद्रेश्वर महास्वामींच्या मूर्तीला रुद्राभिषेक, महामंगलाआरती व जंगम गणांना प्रसाद विनियोग, जंगम दांपत्याला वस्त्र वाटपाचा कार्यक्रम झाला. फ्लो

    वीरभद्रेश्वर जयंती महोत्सवाचे उद्घाटन केल्यावर बोलताना श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले की, जगात वीरशैव धर्माचे संस्थापक वीरभद्र महास्वामी यांची अनेक मंदिरे आहेत. हंपीच्या विजयनगर साम्राज्यात ८४ हून अधिक मंदिरे असून, त्यांनी धार्मिक वातावरण निर्माण केल्याचा इतिहास आहे. वीरभद्रेश्वर जयंती महोत्सवाचा प्रसार करण्यासाठी वीरशैव लिंगायत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप कंकणवडी यांनी पुढाकार घेतला ही कौतुकाची बाब आहे असे त्यांनी सांगितले.

  • यावेळी कटकोळ एम. चंदरगी येथील रेणुका गडदेश्वर यांनी वीरभद्र महास्वामींच्या पूजेला आरंभ केला. गोकाकचे योगी ब्रह्मानंद स्वामीजी, हुक्केरी हिरेमठच्या गुरुकुल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष निशांत स्वामी हिरेमठ उपस्थित होते. उगरकोड येथील हिरेमठाचे श्री महांतेश शास्त्री यांनी पहाटे लवकर उठून गंगा पूजन केले. चिक्कोडीचे महांत शास्त्री, प्रज्वल शास्त्री, अनिल शास्त्री आदी उपस्थित होते. राणेबेन्नूरचे चेतनकुमार शास्त्री यांनी विशेष प्रार्थना केली.

Tags: