Belagavi

हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Share

धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना विसर्जनाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध हिंदुत्ववादी संघटनानी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पीओपी गणेशमूर्ती प्लास्टरपासून बनवल्या जातात.त्या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे जलसरोतांवर परिणाम होतो त्याशिवाय मूर्तींवरील रासायनिक रंग पाणी प्रदूषित करतात. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार शेडूमाती आणि रासायनिक रंग न वापरता तयार केलेल्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून पूजा करावी. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने वाहत्या पाण्यात विसर्ग करण्याची व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन आज हिंदु जनजागृती समितीच्या वारीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.यासंदर्भात बोलताना हिंदू जनजागृती समितीचे नेते मारुती सुतार म्हणाले, पीओपी मूर्तींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे त्यावर बंदी आणणे आवश्यक आहे. पण त्याबाबतचा आदेश लवकर काढला पाहिजे. महाराष्ट्रात गणेश मूर्तीकारांना सरकारकडून शेडू आणि अन्य साहित्य शासनाकडून पुरविले जाते.

त्यामुळे पीओपी मूर्ती बनविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याच पद्धतीने कर्नाटक सरकारनेही जिल्हा प्रशासन, महापालिकेच्या मार्फत श्री मूर्तीकारांना शेडूमाती व सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. बाइट याप्रसंगी मिलन पवार, आक्काताई सुतार, सदानंद मासेकर, परशुराम पाटील, मारुती सुतार आदी उपस्थित होते.

Tags: