खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्यांतर्गत बाळगुंड गावाजवळील नाल्याच्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

सुमारे 25 ते 40 वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह पूर्णपणे नग्न अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. त्याच्या डाव्या हातावरच्या वरच्या बाजूला “हरी” असे गोंदल्यासारखे दिसत आहे.
हा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आहे. याप्रकरणी नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास, ओळख पटवता आल्यास त्यांनी 9480804087/973959166 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments