Hukkeri

कृषी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ईकेवायसी करा : रमेश कत्ती

Share

 

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ईकेवायसी करणे आवश्यक आहे असे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले.

हुक्केरी शहरात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती म्हणाले, पंतप्रधान कृषी सन्मान योजनेंतर्गत भारत सरकार, आणि राज्य शासनाच्या एका महत्वाकांक्षी योजनेंतर्गत ५० हजार रुपये थेट जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे त्यांनी सांगितले. बाईट

त्याचप्रमाणे हुक्केरी कृषी विभागाचे सहाय्यक संचालक महादेव पटगुंडी म्हणाले की, ईकेवायसी करण्यासाठी फक्त 4 दिवस मुदत शिल्लक आहे. शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून देखील योजनेंतर्गत नोंदणी करू शकतात.

यावेळी हुक्केरी नगराध्यक्ष ए. के. पाटील उपस्थित होते.

Tags: