समर्पक वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी अथणी तालुक्यातील सत्ती व दोडवाड येथील ग्रामस्थांनी आज सत्ती येथील हेस्कॉम वीज वितरण केंद्राला टाळे ठोकून आंदोलन केले.
गेल्या आठ दिवसांपासून या गावांना केवळ सहा तास वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण होत आहे. त्यामुळे आपल्या गावांना अखंड सात तास वीज पुरवठा करावा, अशी मागणी निदर्शक ग्रामस्थांनी केली.

आंदोलनाची माहिती मिळताच अथणी हेस्कॉमचे अधिकारी विजयकुमार कोळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता एम. एस. आवटी, अथणीचे सीपीआय रवींद्र नायकवडी, पीएसआय शिवशंकर मुकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी त्यांना जुमानले नाही.
यावेळी बोलताना हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळे यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी घरांना वीज पुरवठा केला जाईल. आठवडाभरात सात तास अखंड वीज पुरवठा करण्यासाठी पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
माजी तालुका पंचायत सदस्य सदस्य जडेप्पा कुंबार, पीकेपीएस अध्यक्ष बी. आर. पाटील, बसवराज दळवाई, एम. एन. पाटील, हनुमंत जगदेव, कांतू हुद्दारे, मुरुगेशा ऐगळी, शिवानंद नंदेश्वर, श्रीशैल चमकेरी, सुरेश बिरडी, बसवराज नावी, रावसाहेब मत्तेप्पनवर, गुरप्पा मशेप्पण्णावर, अण्णाप्पा हुद्दार, मल्लय्या मठद, वसंत सोलनकर आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments