Belagavi

शतायुषी स्वातंत्र्यसैनिक गंगाप्पा मुद्दप्पा माळगी यांचे निधन

Share

शतायुषी स्वातंत्र्यसैनिक, प्रखर गांधीवादी गंगाप्पा मुद्दप्पा माळगी यांचे आज हुदली येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

 

101 वर्षीय गंगाप्पा मुद्दप्पा माळगी बेळगाव जिल्ह्याचे अभिमानास्पद सुपुत्र. त्यांनी महात्मा गांधींचे सहकारी म्हणून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. हुदली खादी ग्रामोद्योग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी 32 वर्षे काम केले. आज दुपारी ३ वाजता स्वग्राम हुदली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. मृत गंगाप्पा मुद्दप्पा माळगी हे माजी आमदार शिवपुत्रप्पा चन्नाबसप्पा माळगी यांचे काका होत. त्यांच्या हुदली येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

Tags: