बेळगावातील मठ गल्ली येथील चिक्कबस्ती मठामध्ये पार्श्वनाथ विधान पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आराधना महिला मंडळाला दशलक्ष्मी पालखी सोहळ्याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले.
होय, बेळगाव येथील मठ गल्ली येथील चिक्कबस्ती मठात पार्श्वनाथ विधान पूजेचे आयोजन करण्यात आले होते. आराधना महिला मंडळाला दशलक्ष्मी पालखी सोहळ्याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीना अनिल बेनके यांच्या हस्ते महिला मंडळच्या पदाधिकाऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना मीना अनिल बेनके यांनी एंजल फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तसेच आराधना महिला मंडळच्या कामाचे कौतुक केले.
याप्रसंगी मिलन पवार, प्रज्ञा शिंदे, अंजुम तसेच आराधना महिला मंडळच्या अध्यक्षा सुरेखा आदिनाथ गौरगोंडा, उपाध्यक्षा राजेशी गौरण्णावर, जयश्री पद्मन्नावर यांच्यासहित महिला मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments