आठवडाभरापासून शांत झालेल्या पावसाने बेळगावात पुन्हा थैमान घातले. दुपारी संततधार पावसाने शहराला चांगलेच झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
होय, बेळगावात आज सकाळपासून स्वच्छ सूर्यप्रकाश होता. मात्र दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे लोकांना बाहेर जाण्यास त्रास झाला. शहरातील चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, खडेबाजार, कॉलेजरोड, शनिवार खुट आदी भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्त्यांवरून सुमारे अर्धा ते एक फूट उंचीवर पाणी वाहात होते. रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी सखल भागात दुकानांत, घरात शिरले. शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात पथारी व्यावसायिकांनी या पावसामुळे एकच धांदल उडाली होती. 
आठवड्याचा, शनिवारी बाजार असल्याने ग्रामीण भागातून बेळगावात आलेल्या खेडूतांची पावसामुळे गैरसोय झाली. गणेशोत्सवाच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मुलांसह आलेले लोकही पावसात अडकून पडले. बेळगाव शहर व परिसरात सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. अनपेक्षित पावसामुळे जनजीवन आणि वाहतूक विस्कळीत झाली.


Recent Comments