पावसामुळे घर कोसळून दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील कसनाळ गावात आज घडली.

शालन भूपाल भगत यांनी त्या राहत असलेल्या घराजवळ दोन म्हशी बांधल्या होत्या. नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे घराच्या भिंती जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर कोसळले.
यावेळी घराच्या भिंती म्हशींवर पडल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाला. त्यामुळे शालन भगत यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी फिरकत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, सचिन शिंदे, अमोल कोळी, किरण जाधव यांनी धाव घेऊन म्हशींना बाहेर काढण्यास मदत केली.


Recent Comments