Belagavi

लिंगराज महाविद्यालयात कन्नड महोत्सव

Share

बेळगावमधील के एल इ संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या कन्नड विभागात कन्नड महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग घेतला.

के एल इ संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या कन्नड विभागात कन्नड महोत्सव तसेच IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात एका विशेष कन्नड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन केएलईचे यूएसएम वैद्यकीय कार्यक्रमाचे संचालक डॉ. एच.बी.राजशेखर, लिंगराज महाविद्यालयाचे अतिथी प्राध्यापक डॉ. बसवराज जगजंपी आदी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाच्या आवारात वाद्यवृंदांनी वादन केले. कन्नड ध्वज फडकावीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून हातात आरती घेऊन तसेच डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कन्नड भाषा जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या साहित्यिकांची चित्रे घेऊन कन्नड भाषेवरचे प्रेम दाखवून दिले.या कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर बोलताना डॉ. एच. बी. राजशेखर म्हणाले, इतिहासकारांनी आपली संस्कृती आणि गतवैभव विसरता कामा नये. अशा कार्यक्रमांमुळे आपल्या संस्कृतीचे जतन होईल. यावेळी एच बी राजशेखर यांनी कर्नाटकचे विभाजन, एकीकरण आणि नामकरण यासंदर्भात माहिती दिली. कन्नड भाषेच्या विकासासाठी सांस्कृतिकदृष्ट्या एकत्र येणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी कन्नड विभागातर्फे आयोजित केलेल्या कन्नड महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना एका विद्यार्थिनीने सांगितले, गेल्या दोन वर्षात कोविड परिस्थितीमुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाही मात्र यंदा मोठ्या उत्साहात हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगतले. यावेळी प्राचार्य तेजस्वी बी एम, कन्नड विभाग प्रमुख डॉ. एच एम चन्नाप्पागोळ, डॉ. एच एस मेलिनमनी, डॉ. आर एम कठारी, आयक्युसी संयोजिका विभा हेगडे, विनोद हरगापूर, अपर्णा हुलकुंड आदींसह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Tags: