Belagavi

बेळगावात बिबट्याच्या शोधासाठी २३ व्या दिवशीही मोहीम

Share

बेळगावात चपळ अन चलाख बिबट्याचा शोध घेण्यासाठी आज २३ व्या दिवशीही कारवाई सुरूच आहे. सोमवारी ज्या ठिकाणी बिबट्याने रस्ता ओलांडला त्या ठिकाणी हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

गोल्फ कोर्समध्ये बिबट्याला पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. गोल्फ मैदानाच्या बाजूला असलेल्या  क्लब रोडवर बिबट्या येऊन पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे क्लब रोडच्या शेजारी हत्तीवर बसून वन्यजीव तज्ज्ञ  डॉ. विनय हे बारीक लक्ष ठेवून आहेत.बिबट्या जनरेस येताच ट्रँक्विलायझर गनने गोळीबार करून त्याला बेशुद्ध करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

त्यामुळे बेळगाव ते हिंडलगा यांना जोडणाऱ्या क्लब रोडवर बॅरिकेड लावण्यात आले आहे. 250 एकरपेक्षा जास्त परिसरात 300 हून अधिक जवान गस्त घालत आहेत. बिबट्याला लवकरच  जेरबंद करण्याचा दावा वनखात्याने केला आहे. त्याला कितपत यश मिळेल हे पहावे लागेल.

Tags: