स्मशानात पुरलेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी उकरून काढून रस्त्याकडेला आणल्याची संतापजनक घटना विजापुरातील जिल्हा पंचायत मार्गावरील स्मशानाजवळ घडली आहे.
होय, अंत्यविधी करून पुरलेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी उकरून काढल्याची संतापजनक घटना घुमटनगरी विजापुरात घडली आहे. इतकेच नाही तर बाहेर काढलेला मृतदेह ओढत रस्त्याकडेला आणून टाकला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली असून स्थानिक नागरिकांतून संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
मृत्यूनंतरही मयताची अशी विटंबना झाल्याने खेद व्यक्त करण्यात येत आहे. असे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने या स्मशानभूमीत सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. फ्लो


Recent Comments