Belagavi

शिंदोळीत मृणाल हेब्बाळकर यांच्याहस्ते रस्ताकामाला चालना

Share

ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. ही कामे दर्जेदार होण्याची दक्षता नागरिकांनी घेऊन या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन  काँग्रेसचे युवा नेता मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिंदोळी गावातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामासाठी आमदारांच्या अनुदानातून 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. स्थानिक लोकांसमवेत मृणाल हेब्बाळकर यांनी भूमिपूजन करून काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. आगामी काळात आमदारांच्या नेतृत्वाखाली आणखी विकासकामे करण्यात येत असून बेळगाव ग्रामीण मतदारसंघाला आदर्श बनविण्याचे उद्दिष्ट आहे. युवकांनी अधिक सक्रिय होऊन विकास कामात हातभार लावावा असे आवाहन मृणाल हेब्बाळकर यांनी केले.

यावेळी गावातील ज्येष्ठमंडळी, शिवकुमार सायबन्नवर, शीला तिप्पाण्णागोळ, लक्ष्मण पाटील, अभिषेक पाटील, शीतल, मल्लाप्पा शहापूरकर, ग्रामपंचायत उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

Tags: