बेळगाव महानगर पालिकेच्या दैनंदिन कारभारात आणि पालिकेच्या व्यवहारात, फलकांवर मराठीचा वापर करण्याच्या मागणीसाठी बेळगावात माजी नगरसेवकांनी आज एल्गार पुकारला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
होय, बेळगाव महानगरपालिकेकडून नागरिकांना सर्व प्रकारच्या पावत्या, चलन आणि कागदपत्रे पूर्वीप्रमाणेच कन्नड बरोबरच मराठी भाषेतून द्यावीत, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे. नगरसेवकांना पालिका कामकाजाची नियमावली, नागरिकांना घर-पाणीपट्टीच्या पावत्या, विविध प्रकारचे अर्ज नमुने, उतारे व अन्य संबंधित कागदपत्रे पूर्वीप्रमाणे कन्नड प्रमाणेच मराठी भाषेतूनही द्यावी अशी मागणी माजी नगरसेवकांनी व मराठी भाषिकांनी केली आहे.
आज शुरवारी या मागणीसाठी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, शिवाजी सुंठकर आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून निदर्शने केली. त्यानंतर या संदर्भात मनपा प्रशासक असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. माजी महापौर ऍड. नागेश सातेरी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देऊन विस्तृत माहिती दिली.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले, बेळगाव महानगरपालिका नगरपरिषद असताना पूर्वीपासूनच नागरिकांना कन्नड तसेच मराठी भाषेत सर्व कागदपत्रे, पावत्या, चलन व अन्य कागदपत्रे देण्यात येतात. त्याचप्रमाणे येथून पुढेही देण्यात यावीत. तसेच गोवा आणि महाराष्ट्रातून अनेक लोक व्यापार वहिवाटीची दररोज बेळगावात येतात. त्यामुळे त्यांना शहराची माहिती होण्यासाठी कन्न्डसोबतच मराठी भाषेतच रस्ते, कार्यालयांचे फलक लावावेत. अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावरची लढाई द्यावी लागेल असा इशारा सुंठकर यांनी दिला. बाईट
यावेळी माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, किरण सायनाक, सरिता पाटील, माजी नगरसेवक ऍड. अमर येळ्ळूरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आदी उपस्थित होते.


Recent Comments