गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जिल्हा पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये आज रूट मार्च काढण्यात आला.
होय, विघ्नहर्त्याचा उत्सव येत्या ३१ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. दहा दिवसांचा गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी बेळगाव जिल्हा पोलिसांनी दक्षता घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील प्रमुख शहरांमध्ये जिल्हा पोलीस दलातर्फे स्थानिक पोलिसांच्या सहभागाने आज शुक्रवारी पथसंचलन करण्यात आले.

सौंदत्ती, रामदुर्ग, खानापूर, यरगट्टी तालुका परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढला. यावेळी पोलिसांनी हातात लाठी घेऊन पथसंचलन करत जनजागृती करत समाजकंटकांचा उपद्रव खपवून घेतला जाणार नाही असा कडक इशारा दिला.


Recent Comments