Belagavi

बेळगावात ओम शक्ती महिला मंडळाचे उद्घाटन

Share

बेळगावातील ओमनगर, खासबाग येथे ओम शक्ती महिला मंडळाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला.

ओमनगर येथे ओम शक्ती महिला मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. आज शुक्रवारी झालेल्या ओम शक्ती महिला मंडळाच्या उदघाटन कार्यक्रमात स्थानिक नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक राजू भातकांडे, रवी सांबरेकर, जयंत जाधव, मायक्रो इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष रमेश देसुरकर उपस्थित होते. त्याचबरोबर महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही पार पडला. महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्मा लटकन, उपाध्यक्षा रीना वनकुद्री, राधिका बिडीकर, माधुरी उंडाळे, ललिता असोपाचे, धनश्री पिसे, रुचिता गुरव आदी उपस्थित होते.

Tags: