मोटारसायकलवरून जाणाऱ्या एकाची दिवसाढवळ्या कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बेळगाव तालुक्यातील हलगा गावात घडली आहे.

बेळगाव तालुक्यातील तारिहाळ गावातील गदगय्या हिरेमठ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने पळ काढला. मोटरसायकलवर बसलेला असतानाच पाठीमागून येऊन कोयत्याने जबर वार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे शीर तुटलेल्या अवस्थेतच त्याचा मृतदेह मोटरसायकलवर पडलेला होता.
अशा अवस्थेतील मृतदेह पाहून हलगा ग्रामस्थही हादरले. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे सीपीआय विजयकुमार सींनुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.


Recent Comments