Belagavi

श्रींच्या मंडपात आता सावरकर प्रतिमा!

Share

देव-धर्म झुगारून माणुसकीचे नाते जपणारे सतीश जारकीहोळी यांनी यंदाच्या गणेशोत्सवात सावरकरांच्या प्रतिमेला श्रीगणेश मंडपात स्थान दिले आहे. सावरकरांची प्रेरणा आता प्रत्येकाला श्री गणेश मंडपातून मिळणार अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध व्याख्याते चक्रवर्ती सुलिबेले यांनी दिली.

समादेवी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रात ते बोलत होते. सतीश जारकीहोळी हे देवपूजेला मानत नाहीत. मात्र त्यांनी श्री गणेशोत्सवाच्या मंडपात वीर सावरकरांनाही स्थान दिले. देव-देश-धर्म यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे वीर सावरकर यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, अशाच पद्धतीने राज्यभरात सर्वांनी हिंदू धर्म पुनर्संघटनेचे काम करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात बोलताना ते म्हणले, हिंदूंना वाट्टेल त्या पद्धतीने मारले जाते आहे. यासाठी हिंदू धर्माचे पुनर्संघटन करून आपल्यातील उणीव दूर केल्या पाहिजे. वीर सावरकरांच्या प्रेरणेतून या साऱ्या गोष्टी नक्कीच पुन्हा हिंदूंसाठी प्रेरणादायी ठरतील. पुन्हा धर्मप्रेमाच्या भावना पुनर्जीवित होतील, शिवाय सावरकर हे कुणा एकाचे नसून ते संपूर्ण राष्ट्राचे असल्याचे ते म्हणाले.

गणेशोत्सव मंडपात यापूर्वी केवळ लोकमान्य टिळकांचा फोटोच पाहायला मिळायचा. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात वीर सावरकरांचाही फोटो पाहायला मिळणार असून वीर सावरकांच्या प्रेरणेतून हिंदू धर्म संघटन होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Tags: