शोटोकन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन इंडियाच्या बेळगावातील कराटेपटूंनी शिमोगा येथे झालेल्या तिसऱ्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप–२०२२ मध्ये चमकदार कामगिरी करून सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली आहे.
कर्नाटक स्टेट कराटे असोसिएशन, मौएली शोटोकन कराटे असोसिएशन-इंडिया आणि शिमोगा शहर कराटे असोसिएशन यांच्या सहयोगाने शिमोगा येथे नुकतीच तिसरी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंनी चमकदार कामगिरी केली. शोटोकन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन इंडियाच्या विजयनगर-बेळगाव संत मिरा इंग्लिश मीडियम स्कूल येथील शाखेच्या श्रीशैल चंद्रकांत कुंडेकर, संचित कवठणकर, दक्ष वरूटे यांनी काता प्रकारात सुवर्णपदके मिळवली. काता प्रकारातच नेहाल पाटीलने रौप्य व कुमीते प्रकारात सुवर्ण, प्रेमजीत भिलवडे याने रौप्य तर स्पुर्ती नांदवडेकरने कुमीते प्रकारात सुवर्ण व काता प्रकारात कांस्य, ज्ञानेश्वर चिक्के, ओंकार शिंदे, श्रेयस कुंडेकर यांनी काता प्रकारात कांस्य आणि सुजल गुरव याने कुमीते व काता प्रकारात कांस्यपदके पटकावली.
अगसगे शाखेच्या यश मेणसे याने कुमीते प्रकारात रौप्य, विनय डोनकरी, तनुजा डोनकरी आणि प्रथम पाटील यांनी काता प्रकारात कांस्य पदके मिळवली. बोडकेनहट्टी शाखेच्या धनराज पाटीलने काता प्रकारात सुवर्ण, जितेश तवनोजीने काता प्रकारात रौप्य व कुमीते प्रकारात कांस्य पदक मिळवले. त्यांना कराटे प्रशिक्षक सेन्सी भरमाणी मल्लप्पा पाटील (चलवेेनहटी) यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
शिमोगा नेहरू क्रीडांगणावर स्पर्धेनंतर झालेल्या शानदार समारंभात टूर्नामेंट डायरेक्टर शिहान पीएरे मौएली (अमेरिका), कन्नड चित्रपट अभिनेते सुमन तलवार, शिमोगा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष व आयोजक शिहान शिवमोग्ग विनोद, हॅनशी मेन्डोन्झा (श्रीलंका) यांच्याहस्ते विजेत्या कराटेपटूंना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल या कराटेपटूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Recent Comments