२०२२ सालच्या पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा प्रथमच बेळगावमध्ये आयोजित करण्यात आल्या असून मनपा क्रीडा संकुलात होत असलेल्या या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने टेनिसपटूनि सहभाग घेतला आहे.
कर्नाटक स्टेट टेबल टेनिस असोसिएशन, बेळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आणि कर्नाटक टेबल टेनिस दिव्यांग असोसिएशन (दिव्यांग) यांच्या संयुक्त विद्यमाने २०२२ सालच्या पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धांना बेळगावमध्ये गुरुवारी प्रारंभ झाला. राज्यातील सर्व जिल्ह्यातून सुमारे ३० ते ५० पॅरा टेबल टेनिसपटू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. व्हीलचेअर विभाग, स्टँडिंग विभाग अशा दोन विभागात या स्पर्धा पुरुष आणि महिला गटात होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेले टेनिसपटू आपले कौशल्य दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत.
यासंदर्भात आपली मराठीला प्रतिक्रिया देताना संजीव हनम्मण्णावर म्हणाले, यापूर्वी या स्पर्धा बेंगळूरमधील कंठीरव स्टेडियममध्ये आयोजित केल्या जायच्या. मात्र यंदा बेळगावमध्ये प्रथमच या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. भावना पटेल, सोनल पटेल या खेळाडूंनी राष्ट्रकुलमध्ये पदक जिंकले आहे. कर्नाटकातील पाच खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली आहेत. अशा स्पर्धा बेळगावमध्ये प्रथमच आयोजित केल्या असून बेळगावकरांनी या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या ठिकणी यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा टेबल टेनिस ओसीएशनचे सचिव संगम बैलुर बोलताना म्हणाले, पॅरा टेबल टेनिस स्पर्धेचे बेळगावमध्ये आयोजन करण्यात आले असून टेबलटेनिसपटूनसाठी हि आनंदाची बाब आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्वोत्तम खेळाडू बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. हि स्पर्धा २८ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती बैलुर यांनी दिली.
यावेळी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विनय मंगळेकर, उपाध्यक्ष दीपक यक्कुण्डी, यशोधर कोटियान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ऑगस्ट २८ पर्यंत सुरु राहणाऱ्या या स्पर्धा पाहण्यासाठी टेनिसप्रेमींनी अवश्य या स्पर्धेच्या ठिकाणी भेट द्यावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे.


Recent Comments