Khanapur

नेरसा गवळीवाडा येथे नवजात अर्भक आढळले; झाडाला लटकवलेल्या पिशवीत होते बाळ 

Share

एका नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घालून ती पिशवी झाडाला लटकवण्यात आल्याची खळबळजनक घटना खानापूर तालुक्यातील अशोक नगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नेरसा गवळीवाडा येथे उघडकीस आली आहे. होय, आशा कार्यकर्त्या सत्यवती देसाई यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक ठेवल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला कळवले, 108 रुग्णवाहिका बोलावून अर्भकाला खानापूर तालुका सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे बालरोगतज्ञ डॉ. पवन पुजारी यांनी त्याची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. नंतर अधिक उपचारांसाठी अर्भकाला बेळगावच्या बीम्स जिल्हा इस्पितळात दाखल केले. हे अर्भक निरोगी असून त्याचे वजन 2.5 किलो आहे. या बालकाला रात्रीच्या वेळी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवण्यात आले होते. त्याची तब्येत थोडी बिघडलेलीच होती. त्यामुळे अधिक उपचारासाठी त्याला बेळगाव येथे पाठविण्यात आले.

दरम्यान, खानापूर तालुक्यात असे प्रकार उघडकीस येत असून महिला व बालविकास विभागाचे अधिकारी याबाबत जनजागृती करण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. खानापूर तालुक्यात गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.

Tags: