अथणी शहरातील आंबेडकर नगर येथील शिकलगार गल्ली येथील श्री दुर्गा देवी मंदिराच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी आज भूमीपूजन करण्यात आले.

मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सांगितले की, शिकलगार समाजातर्फे 10 लाख रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. आमच्या गल्लीतील दुर्गादेवी मंदिर हे 150 वर्षांहून अधिक जुने मंदिर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा जीर्णोद्धार करण्याचा विचार सुरु होता.
आता समाजबांधवांच्या देणग्यांतून मंदिराची नवीन इमारत बांधून जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. त्यासाठी आज भुईपूजन करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक दिलीप लोणारे, दत्ता वासकर, कलमेश मड्डी, सुधीर मड्डी, सिद्धार्थ मड्डी, सिद्दू मोटगी, सिदलिंग मड्डी, शशी साळवे, दिलीप शिकलगार, शंकर शिकलगार, संजू शिकलगार, चंदू शिकलगार, उमेश शिकलगार, राहुल शिकलगार, धोंडिबा माने, संदीप घटकांबळे, बाबू कांबळे आदी उपस्थित होते.


Recent Comments