कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा मिळत आहेत मात्र त्यांना थेट मोबदला म्हणून जमीन आणि घरे मिळत नाहीत. त्यामुळे जिथे संधी मिळेल, शक्य असले तिथे स्वच्छता कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील, अशी माहिती सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शिवन्ना कोटे यांनी दिली.
बेळगाव जिल्हा पंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बुधवारी सुवर्णसौध येथे जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या ३८ ईएलबीसी आणि पंचायतींमध्ये कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या समस्यां जाणून घेतल्या. या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी आज बैठकीचे आयोजन केले.
यावेळी बोलताना शिवन्ना कोटे म्हणाले, बेळगावमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र क्वाटर्स देण्यात यावेत, अशी मागणी जागृती समिती आणि इतर नागरिकांनी केली आहे. यानुसार एक ऐतिहासीक निर्णय घेण्यात आला असून १२ स्वच्छता कर्मचाऱ्यांना हक्कपत्र दिले आहे. पुढील पडताळणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पात्र लाबभार्थ्यांना घरे वितरित करण्यात येतील.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना आयुष्य कसे जगावे, सुविधांचा लाभ कसा घ्यावा यासंदर्भात जागृती नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करण्याचे काम देखील होण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी ईएसआय, पीएफ नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना दर्जेदार नाश्ता उपलब्ध करून द्यावा, महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष बांधण्यात यावेत, अशा सूचना यावेळी शिवन्ना कोटे यांनी दिल्या.
या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments