Chikkodi

नसलापूर-नंदीकुरळी दरम्यानचा रस्ता हरवला खड्ड्यात !

Share

सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक योजना आखल्या आहेत. छोटे रस्तेही विकसित केले जात आहेत. मात्र रायबाग तालुक्यातील नसलापूर ते नंदीकुरळी दरम्यानचा सुमारे तीन किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नंदीकुरळी, मेखळी, अंकली, मांजरी, बावनसौंदत्ती, डिग्गेवाडी हा शेजारील महाराष्ट्र राज्यात जाण्यासाठी  महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र तो खराब झाल्याने या रस्त्यावरून दररोज शाळेत जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे दुचाकीसह मोठी वाहने समोरून येवून अपघातही घडले आहेत. याठिकाणी वाहनधारकांची गैरसोय होत आहे. नंदीकुरळी गावातून रुग्णाला  अंकली गावात आणताना खराब रस्त्यामुळे वाहनातच धक्के बसून रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरात लवकर रायबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारीतील या तीन किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून चांगला रस्ता तयार करावा, अशी मागणी जनतेने केली आहे.

Tags: