Khanapur

खानापूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आ. निंबाळकर नाराज; आंदोलनाचा इशारा  

Share

वारकरी संप्रदायाच्या सतत संपर्कात राहणाऱ्या, साध्या अत्यंत सज्जन वृद्ध व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना खानापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपींवर कारवाई करणाऱ्या खानापूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गणेबैल येथील रहिवासी राजाराम गुरव यांना काल, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास काहींनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. याची माहिती मिळताच आमदार निंबाळकर स्वत: काल रात्री खानापूर पोलिस ठाण्यात गेल्या आणि पोलिसांना कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले.

आरोपींना अटक न केल्याने आमदार अंजली निंबाळकर यांनी आज पुन्हा 11.30 वाजता पोलीस ठाण्याला भेट दिली. आज आरोपींना अटक न झाल्यास पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करू असा इशारा आमदार अंजली निंबाळकर यांनी दिला. खानापूर पोलीस ठाण्यात लोकांना न्याय मिळत नाही. पोलीस गुन्हे रेकॉर्डवर व आणता तडजोडीने मिटवण्यात रस घेतात. निष्पक्षपणे कारवाई का होत नाही, असा सवाल करत यापुढे खानापूर पोलिसांचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा आ. अंजली निंबाळकर यांनी दिला आहेफ्लो

Tags: