चिक्कोडी तालुक्यातील सदलगा नगरपालिकेच्या हद्दीतील भैनाकवाडी गावात प्रथमच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी भैनाकवाडी गावात दररोज सकाळ –ध्याकाळ बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रहिवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे.

मुरारी कुरबेट्टे, अभिनंदन पाटील यांच्या हस्ते आज चिक्कोडी सदलगा मार्गावरील भैनाकवाडी गावातून जाणाऱ्या बसचे पूजन करण्यात आले. बस चालक व कंडक्टर यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ चिक्कोडी विभागाचे अधिकारी, चालक व वाहक व कर्नाटक रक्षण वेदिकेचे पदाधिकारी यांचा सत्कार करून भैनाकवाडी ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी अमित कमते, अनिल पुजारी, आप्पासाहेब नमोजे, अण्णाप्पा सनदी, सदाशिव नमोजे, बाबू जाधव, अप्पासाबा नमोजे, आण्णाप्पा कुरबेट्ट, आण्णाप्पा सनदी, कांत नमोजे, पोपट बेदुर्गे, चंदू खोत, विनोद जाधव, गुंडू कुंटे, पिंटू कुरळे, विध्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments