अखेर बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात सरकारने दोन्ही पदांसाठी आरक्षण जाहीर केले आहे.
महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर उपमहापौरपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असून, गेल्या एक वर्षापासून सत्तेविना संघर्ष करणाऱ्या नगरसेवकांना सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे त्यांचा महापालिका प्रवेश निश्चित झाला आहे.
आरक्षण जाहीर झाल्याने लवकरच महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक अधिकारी असलेले बेळगावचे प्रादेशिक आयुक्त निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. दोन आठवड्यात बेळगाव महापालिकेच्या नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे.
आरक्षण जाहीर होताच महापौर-उपमहापौर पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने मराठा समाजाचाच नगरसेवक नवा महापौर होण्याची शक्यता आहे.


Recent Comments