Belagavi

चिकोडी येथे विविध दलित संघटनांनी केला तालुका प्रशासनाचा निषेध

Share

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चिकोडी तालुका प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज चिकोडी येथील विविध दलित संघटनांनी निषेध मोर्चा काढून तालुका प्रशासनाचा निषेध केला.

चिकोडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा बसव सर्कलमार्गे मिनी विधानसौध पर्यंत काढण्यात आला.

 

१५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात तालुका प्रशासनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा विसर पडला. यामुळे तालुका प्रशासनातील अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यानंतर चिकोडी तहसीलदार आणि चिकोडी उपविभागाधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

 

 

यावेळी दलित नेते बसवराज ढाके, अर्जुन माने, निरंजन कांबळे, श्रीनाथ घट्ट, जीवन मांजरेकर, संतोष दोडामानी, उदय वाघमोरे, विनोद चितळे, अप्पासह ब्याळी, सुदर्शन तम्मण्णावर, संजय भोसले, नंदकुमार दरबार, विद्याधर चितळे, रामचंद्र शिप्पूरे आदींसह विविध दलित संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: