Belagavi

देवराज अरस जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

Share

दीनदलितांच्या सर्वांगीण विकासाचे प्रणेते डी. देवराज अरस यांच्या 107 व्या जयंती सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज बेळगाव शहरात करण्यात आले होते.

होय, समानतेचे पुरस्कर्ते, माजी मुख्यमंत्री डी. देवराज अरस यांचा 107 वा जयंती सोहळा जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव, जिल्हा मागासवर्गीय कल्याण विभाग, महानगरपालिका आणि देवराज विकास निगम यांच्या सहयोगाने पार पडला. शहरातील कुमार गंधर्व सभागृहात आयोजित या कार्यक्रमात मंगळवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्देश आधारित माइमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना मागासवर्गीय कल्याण विभागाचे उपसंचालक लक्ष्मण बबली म्हणाले की, सरकारच्या निर्देशानुसार 2022-23 मध्ये आम्ही डी. देवराज आरासू यांचा 107 वी जयंती आम्ही साजरी केली. यानिमित्ताने विविध वस्तूंचा खरेदी-विक्रीचा मेळा आयोजित करण्यात आला आहे. मॅट्रिकोत्तर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धापरीक्षातील विजेत्याना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. देवराज अरस जयंतीनिमीत्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 14 मुरारजी देसाई निवासी शाळेतील मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद लूटला.

Tags: