Belagavi

चन्नम्मा विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

Share

विद्यार्थी जीवनात यश मिळवण्यात अनेक अडथळे येतात. ते अडथळे दूर केले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा,. साधकाना मार्गात येणाऱ्या अनेक अडथळ्यांना आणि चिंतांना धैर्याने तोंड द्यावे लागते. धैर्य ही माणसाला देवाची सर्वात मोठी देणगी आहे असा कानमंत्र जेष्ठ अभिनेते रमेश अरविंद यांनी विध्यार्थ्यांना दिला.

राणी चन्नम्मा विद्यापीठ जिमखान्याच्या वतीने आज मंगळवारी केएलई भवन येथे आयोजित 2022 च्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी बोलताना अभिनेते रमेश अरविंद म्हणाले की, माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या येणे स्वाभाविक आहे. समस्या लहान असताना सोडवणे चांगले आहे. सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा, परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांचा प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षांना धैर्याने सामोरे गेल्यास श्रेय निश्चित आहे असा कानमंत्र विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.

या कार्यक्रमात रॅम्बो-2 चित्रपटाचे गाणे वाजविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. तसेच मोबाईल टॉर्च लावून आपली उपस्थिती दर्शवली.

दरम्यान, राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

 

समारंभाचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. कुलगुरु एम. रामचंद्र गौडा होते. कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली, परीक्षा कुलसचिव प्रा. शिवानंद गोरनाळे, वित्त अधिकारी प्रा. डी.एन.पाटील, जिमखान्याचे अध्यक्ष प्रा. व्ही. एफ. नागन्नवर, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस.बी.आकाश व्यासपीठावर उपस्थित होते. सुप्रिया गुरव, लगमन्ना अंकलगी, परशुराम मूकन्नवर, शालिनी देशनुर, विमोचन असोदे आदी विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags:

ramesh arvind rcu gymkhana day