श्रावण महिन्यातील प्रवचने चांगला समाज आणि सुसंवादी जीवनासाठी आपल्या जीवनात प्रेरक शक्ती बनतात असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने बेळगाव तालुक्यातील सांबरा गावात श्री बसवेश्वर मंदिर येथे अडवी सिद्धेश्वर मठाचे श्री अडवी सिद्धेश्वर देवरु यांच्या नेतृत्वाखाली आयोजित दुसऱ्या वर्षाच्या ‘आध्यात्मिक प्रवचन’ कार्यक्रमात सहभागी होऊन त्या बोलत होत्या.
प्रवचने मानवी जीवनासाठी उपयुक्त आहेत, प्रवचने ऐकल्याने मनाला शांती मिळते, तसेच समाजाला नवा आनंद देऊन चांगला संदेशही जातो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सुळेभावी स्वामीजी, शिवाजी देसाई, नागेश देसाई, संजनगोंडा पाटील, सदाशिव पाटील, सुरेश देसाई, मोहन नायका, महिला मंडळ सदस्य, ग्रामपंचायत व मंदिर समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments