बेळगावकरांना रुचकर पिझ्झा खाण्याची संधी देणाऱ्या ‘पिझ्झा बर्स्ट’ ने बेळगावमध्ये एक वर्ष पूर्ण केले असून आज मोठ्या उत्साहात या संस्थेचा वर्धापन दिन साजरा झाला आहे.
पिझ्झा, नूडल्स, बर्गर खाण्याची बेळगावकरांची इच्छा पिझ्झा बर्स्ट ने पूर्ण केली आहे. स्वादिष्ट आणि रुचकर चवीचे हे पदार्थ बेळगावकरांना खूपच भावले असून गेल्या वर्षांपूर्वी सुरु झालेल्या बेळगावमधील पिझ्झा बर्स्ट शाखेने ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्ससहित पिझ्झा खाण्याची मेजवानीही दिली आहे. पिझ्झा, बर्गर, पास्ता, नाचोस, गार्लिक ब्रेड, फ्रेंच फ्रीज, स्नॅक्स यासह विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ पिझ्झा बर्स्ट ग्राहकांच्या सेवेत दाखल करत असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्रेझी कॉम्बो आणि अनलिमिटेड मिल्स देखील पिझ्झा बर्स्ट कडून देण्यात येतात. विशेष प्रसंग, वाढदिवसाची मेजवानी यासह अनेक इतर कार्यक्रम देखील याठिकाणी उत्तम प्रकारे साजरे केले जाऊ शकतात.
एका वर्षातच लोकप्रिय ठरलेल्या पिझ्झा बर्स्ट च्या बेळगावमधील खानापूरयेथील शाखेचा पहिला वर्धापन दिन आज भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला . यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रोटेरियन अविनाश पोतदार, जिल्हा गव्हर्नर वेंकटेश देशपांडे, अनंत कुलकर्णी, अशोक नाईक यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अविनाश पोतदार यांच्याहस्ते केक कापून वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अविनाश पोतदार म्हणाले, आजच्या तरुणपिढीला पिझ्झा बर्स्टच्या माध्यमातून रुचकर मेजवानी मिळाली आहे. पिझा बर्स्टच्या माध्यमातून यापुढील काळातही बेळगावकरांना अशाच विविध पदार्थांची मेजवानी मिळावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
रोटेरियन वेंकटेश देशपान्डे आणि अनंत कुलकर्णी म्हणाले, हल्लीच्या तरुणाईला पिझ्झा, बर्गर सारखे पदार्थ दररोज लागतात. पिझ्झा बर्स्टमुळे तरुणाईला असे पदार्थ चाखण्याची संधी मिळाली. शिवाय विविध आकर्षक ऑफर्सदेखील मिळाल्या. पिझ्झा बर्स्टकडून मिळणाऱ्या चवीमुळे बेळगावकर आकर्षक होत असून अशाच नवनवीन पदार्थांची मेजवानी पुढील काळातदेखील मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. 
पिझ्झा बर्स्टचे प्रोप्रायटर अमरदीप पाटील बोलताना म्हणाले, एका वर्षात बेळगावकरांनी दिलेला प्रतिसाद आणि आमच्यावर दाखवलेला विश्वास याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. पुढील काळातदेखील असाच प्रतिसाद आपल्याला मिळावा, आणि बेळगावकरांना नवनवीन पदार्थांची मेजवानी देण्याची संधी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
नवनवीन पदार्थांची चव चाखता यावी यासाठी बेळगावमध्ये गेल्या वर्षात सुरु झालेल्या पिझ्झा बर्स्टने ग्राहकांची मने जिंकली आहेत. आपणदेखील येथे एकदा अवश्य भेट देऊन येथील पदार्थांची चव चाखण्यात काहीच हरकत नाही.


Recent Comments