चिक्कोडी– सदलगा विधानसभा मतदारसंघातील जोडकुरळी गावात 68 लाख रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, आमदार प्रकाश हुक्केरी आणि मी एकत्र येऊन मतदारसंघातील सर्व प्रमुख रस्त्यांचा विकास करत आहोत. शेताच्या बांधापर्यंत रस्ते निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला. पूर्वी शेतकरी त्यांच्या शेतात सायकलही घेऊन जाऊ शकत नव्हते. रस्त्यांअभावी वेळेवर उसाची वाहतूक करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे ९० टक्के शेतवडीचे रस्ते विकसित करण्यास प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काडापूर ग्रामपंचायत सदस्य बसवराज पाटील, मुरारी नांगनुरे, यल्लाप्पा डुगणे, बाळू गड्डू, भरमा कांबळे, अवक्का रामनकट्टी यांच्यासह काँग्रेसचे नेते व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments