Belagavi

दलित विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा बेळगावमध्ये निषेध

Share

राजस्थान मधील सुराणा येथील दलित विद्यार्थ्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी कर्मचारी संघातर्फे बेळगावमध्ये आंदोलन करण्यात आले.

 

शिक्षकांसाठी राखीव ठेवलेल्या माठातील पाणी प्यायल्याने शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या एका दलित विद्यार्थ्याला मारहाण केली. यात सदर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून या निषेधार्थ आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली.

यासंदर्भात माहिती देताना कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश शीगीहळ्ळी म्हणाले, राजस्थानमध्ये एका दलित विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यात त्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सदर शिक्षकाला कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

 

यावेळी रामू पुजारी, शिवा नाईक, विजय बोकडे, सचिन कोलकर, अखिल सत्याण्णावर, रणजित नंदी, राजू आर के, अक्षय हुब्बळीकर, हैदरअली रफिक, विक्रम हड्पड, आकाश सरकार, नागराज तळवार आदी उपस्थित होते.

Tags:

rajasthan dalit student death valmiki sangh belgaum dc memo nitesh patil