कागवाड तालुक्यातील केंपवाड या गावात आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.

१.५० कोटी रुपयांच्या खर्चातून होत असलेल्या विकासकामांची सुरुवात आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते कुदळ पूजनाने झाली. सोमवारी केंपवाड या गावात आमदार श्रीमंत पाटील यांनी जलजीवन अंतर्गत १.३९ कोटी रुपयांच्या खर्चातून घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. गावातील सरकारी शाळेत ३६ लाख रुपयांच्य खर्चातून बांधण्यात आलेल्या सुसज्जित ४ वर्गखोल्यांचे लोकार्पण केले.

यावेळी बोलताना श्रीमंत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘घरघरमे गंगा’ योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचा लाभ प्रत्येक जनतेला मिळावा यासाठी आपण जल जीवन योजना कार्यान्वित करत असल्याचे ते म्हणाले. केंपवाड गावातील जनता हि राज्याच्या आणि साखर उद्योगाच्या विकासाचा कणा असून साखर कारखाना उभारणीत त्यांचे मोठे सहकार्य आहे. या गावच्या विकासासाठी मी प्रयत्नशील असून येथील सरकारी शाळेसाठी बांधण्यात आलेल्या ४ सुसज्जित वर्गखोल्यांचे आज लोकार्पण होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रवींद्र पुजारी, आर एम पाटील, महादेव कोरे, चन्नबसू घाळी, प्रकाश तेली, कुबेर घाळी, मल्लप्पा चुंग, विजय वाली, अप्पासाहेब सावंत, एम डी पवार, बंडू जगताप, आर जे मुरगल्ले, शरीफ इनामदार आदींसह इतर उपस्थित होते.


Recent Comments