Athani

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची लक्ष्मण सवदींनी केली विचारपूस;चालकाच्या मुलांच्या शिक्षणासाठी २ लाख

Share

अथणी बनजवाड महाविद्यालयाच्या वाहन अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी आज माजी उपमुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांनी विविध रुग्णालयांना भेट दिली.

 

या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून वैद्यकीय खर्च करण्यात येणार असून अपघातात मृत्यू झालेल्या चालकांच्या मुलांसाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे लक्ष्मण सवदींनी सांगितले.

विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी आज विचारपूस केली. तसेच या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रघुनाथ अवताडे यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. यानंतर प्रतिक्रिया देताना सवदी म्हणाले, अपघात झाला त्यावेळी आपण बंगळूरला कामानिमित्त गेलो होतो. हि बातमी ऐकून आपल्याला धक्का बसला असून तातडीने तालुका प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या. मृत चालकाने आपला जीव गमावून इतर विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. लष्करातून नुकतेच निवृत्त झालेले रघुनाथ अवताडे यांना दोन लहान मुले असून त्यांच्या शिक्षणासाठी २ लाख रुपयांची मदत करण्यात येईल, तसेच त्यांची पत्नी आणि मुलांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत ठेव ठेवण्यात येईल, असे सवदी म्हणाले.

 

यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे, सीपीआय रवींद्र नायकोडी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी प्रवीण पाटील, पीएसआय मुकरी, बनजवाड महाविद्यालयाचे लक्ष्मण बनजवाड, अनिता बनजवाड, अमर दुर्गान्नावर, श्रीशैल नाईक, कल्लेश मड्डी, संतोष सावडकर, राजू गुडोदगी आदींसह इतर उपस्थित होते.

Tags:

athani accident lakshman savadi visit