खानापूरच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांचा वाढदिवस सलग तीन वर्षे कोरोनामुळे साजरा झाला नाही. पण यावर्षी त्यांच्या चाहत्यांनी रक्तदान करून, रुग्णांना फळे वाटप करून अर्थपूर्णरीत्या साजरा केला.
होय, यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्वतः रक्तदान करून आपल्या साधेपणाचे दर्शन घडवून कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. यावेळी चाहत्यांनी मोठ्या आकाराचा केक कापला. या कार्यक्रमाला त्यांचे पती आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
तसेच शनाया गार्डन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी अंजलीताई फौंडेशनचे कार्यकर्ते किरण कोडोली, सिद्धलिंग मिर्जर, मल्लिकार्जुन रोटी, चंद्रशेखर जोनी, शिवा मकवी, प्रसन्न कुमार, यल्लापा चौगले, प्रशांत जोरापुर, सूर्यकांत कुलकर्णी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील विविध गावच्या जनतेनेही उपस्थित राहून आ. अंजली निंबाळकर याना शुभेच्छा दिल्या.



Recent Comments