Belagavi

हिंडलगा रोडवर पुन्हा बिबट्याचे दर्शन : पोलीस-वनखात्याची संयुक्त मोहीम वेगाने

Share

बेळगाव येथील हिंडलगाकडे जाणाऱ्या क्लब रोडवरील महात्मा गांधी सर्कलजवळ आज सकाळी 6-30 वाजता एका बस चालकाला बिबट्या दिसला. बिबट्या दिसल्याने पोलीस आणि वनखात्याने वेगाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.

बेळगाव शहर व ग्रामीण भागातील 22 प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना आज सोमवार 22 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण खात्याचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले.

दरम्यान, बिबट्याचे दर्शन घडलेल्या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन कारवाई सुरू केली आहे. बिबट्या दिसल्याने पोलीस आणि वनखात्याने संयुक्त मोहीम वेगाने हाती घेतली आहे. गांधी चौकाकडून क्लब रोडकडे जाणारा तसेच याच चौकातून सेंट झेवियर शाळेकडे जाणारा हे दोन्ही मार्ग आज सकाळपासूनच वाहतुकीसाठी बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले. येथून जाणारी वाहतूक शौर्य चौक मार्गे बिस्कीट महादेव मंदिर रस्त्यावर वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडले. संथ गतीने वाहने पुढे सरकत होती.

Tags: