राज्यातील काँग्रेस आणि भाजपमध्ये वादप्रतिवाद सुरूच असून आता वीर सावरकरांवरून सुरु झालेला वाद दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याची चिन्हे आहेत. विजापूरमधील काँग्रेस कार्यालयाच्या भिंतीवर वीर सावरकरांचा फोटो चिकटविण्यात आल्याने पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन घटनेचा निषेध केला असून भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले. यानंतर पुन्हा फोटो चिकटविण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. (फ्लो)
राज्यात सध्या सावरकरांवरील वाद विकोपाला जात आहे. विजापूरमधील बागलकोट मार्गावर असलेल्या जिल्हा काँग्रेस कार्यालयात सदर प्रकार घडला असून काँग्रेस कार्यालयासह या परिसरात अनेक ठिकाणी वीर सावरकरांचा फोटो चिकटविण्यात आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार समजल्यावर जलनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हे फोटो आपण चिकटवले आहेत, अशी माहिती भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष बसवराज होगार यांनी दिली असून काँग्रेसकडून वारंवार होत असलेल्या वीर सावरकरांच्या अवमानावर आपण असे काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने सावरकरांचा आदर राखला पाहिजे, त्यांचा इतिहास वाचला पाहिजे, या साऱ्या गोष्टींना इथेच पूर्ण विराम नाही मिळाला तर त्यांच्या घरावरदेखील सावरकरांचे फोटो चिकटविण्यात येतील, असा इशारा बसवराज होगार यांनी दिला.
यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजू अल्गोर बोलताना म्हणाले, काँग्रेस कार्यालयावर वीर सावरकरांचा फोटो चिकटविणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात यावी, अन्यथा आपण तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला. समाजात अशांतता निर्माण होऊ देणार नाही, असेही अल्गोर म्हणाले. ()
वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या कृत्याचा निषेध करत विजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वीर सावरकरांची प्रतिमा हातात धरून कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाला घेराव घालत घोषणाबाजी केली. पोलिसांनी जलनगर क्रॉसजवळ बॅरिकेड लावून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून आत प्रवेश घेतला. यावेळी कार्यकर्त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना अटक केल्याने या परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी सूट दिल्यानेच भाजप कार्यकर्त्यांनी असे कृत्य केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.
वीर सावरकरांवरील हवामानाच्या निषेधार्थ विजापूरमधील वातावरण तापले असून काँग्रेस आणि भाजपमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता हा वाद कोणते वळण घेईल? कोणत्या वळणावर हा वाद संपुष्टात येईल हे पाहणे गरजेचे आहे.


Recent Comments