हुबळी येथील किम्स इस्पितळात उपचारांदरम्यान मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह नेण्यासाठी जात असलेल्या क्रुझर वाहनाला एका खासगी बसने धडक दिली. त्यात दोघेजण जागीच ठार झाले. ही दुर्घटना आज सकाळी कलघटगी तालुक्यातील रामनाळ क्रॉसजवळ घडली.
होय, हल्ल्याळ तालुक्यातील नंदीगट्टा गावच्या एका रुग्णाचा हुबळीच्या किम्स इस्पितळामध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. अंत्यसंस्कारांसाठी त्याचा मृतदेह नेण्यासाठी मृताचे कुटुंबीय आज सकाळी क्रूझरमधून हुबळीकडे येत होते. कलघटगी तालुक्यातील रामनाळ क्रॉसजवळ या क्रुझरला खासगी बसची जोरदार धडक बसली. या अपघातात नंदीगट्टा येथील शिवनगौडा पाटील आणि अमृत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. क्रूझरचालक मारुती गंभीर जखमी झाला तर देवेंद्र बचावला. अपघातामुळे क्रूझर वाहनाचे दोन तुकडे झाले. याप्रकरणी कलघटगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments