Banglore

मुख्यमंत्र्यांचे माध्यम समन्वयक गुरुलिंगस्वामी होळीमठ यांचे निधन

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे माध्यम समन्वयक गुरुलिंग स्वामी होळीमठ यांचे आज सोमवारी सकाळी बेंगळुर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते अवघ्या 40 वर्षांचे होते.

आज सकाळी होळीमठ नेहमीप्रमाणे जिमला गेले होते. त्यावेळी कसरत करताना ते अचानक खाली कोसळले.  त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले असे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले.

विविध वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्समध्ये काम केलेल्या गुरुलिंगस्वामी यांनी बसवराज बोम्मई गृहमंत्री असतानाही त्यांचे मीडिया सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे.

Tags: