बेळगाव महानगरपालिकेवर निवड झालेल्या नगरसेवकांना निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप त्यांना अधिकार मिळाले नाहीत. सरकारी आदेशानुसार पालिका महापौर – उपमहापौर निवडणूक घेऊन वॉर्डच्या विकासासाठी संधी द्यावी, अशी मागणी करत आज नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे.
मनपा निवडणुकीला एक वर्ष उलटूनही अद्याप अधिकार मिळाले नाहीत. महापालिकेवर महापौर आणि उपमहापौरांची निवड झाली नाही. अधिकार हाती नसल्याने वॉर्डचा विकास करण्यात अडथळे निर्माण होत असून वॉर्डमधील ड्रेनेज, कचरा, पिण्याचे पाणी आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे महापौर – उपमहापौर निवडणूक आणि नगरसेवकांचा शपथविधी लवकरात लवकर व्हावा, यासाठी आज नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्त गीता कौलगी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नगरसेवकांनी सांगितले कि, आपल्या वॉर्डमध्ये अनेक नागरी समस्या उद्भवत आहेत. मात्र अद्याप आपल्या हाती अधिकार न आल्याने तसेच महापौर – उपमहापौरपदावर अद्याप कुणाची निवड न झाल्याने वॉर्डचा विकास खुंटला आहे. कोणतीही विकासकामे हाती घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे लवकरात लवकर महापौर उपमहापौर निवडणूक घेऊन नगरसेवकांचा शपथविधी देखील व्हावा, अशी मागणी प्रादेशिक आयुक्तांकडे करण्यात आल्याचे नगरसेवकांनी सांगितले. () + () + ()+ ()
यावेळी नगरसेवक मुझामिल डोणी, रवी साळुंखे, बाबाजानी मतवाले, खुर्शीद मुल्ला आदींसह इतर नगरसेवक हजर होते.


Recent Comments