Vijayapura

काँग्रेस कार्यालयात सावरकरांचा फोटो लावणे चुकीचे नव्हे : आ. यत्नाळ

Share

काँग्रेस कार्यालयात सावरकरांचा फोटो लावणे चुकीचे नसल्याचे विजापूरचे आमदार बसनगौडा पाटीलयत्नाळ यांनी सांगितले.

विजापुरात सोमवारी बीडीए कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. यत्नाळ  म्हणाले, “काँग्रेस हा भारताचा पक्ष आहे.. की पाकिस्तानचा पक्ष..?” आमच्या युवा मोर्चाने चांगले काम केले आहे.

सावरकरांबद्दल अवमानास्पद बोलणे ही काँग्रेसची संस्कृती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. सावरकरांऐवजी सोनिया गांधी, तो गांधी आणि हा गांधी असे फोटो लावल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

Tags: