Vijayapura

रेशन तांदळाची तस्करी : एकाला अटक

Share

रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करताना पोलिसांनी छापा टाकून ९१ पोती तांदूळ जप्त करून एकाला अटक केली. ही घटना विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील तडवलगा गावात घडली.

श्रीधर अण्णाप्पा इंडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वाहनात भरलेल्या 50 किलो वजनाची तांदळाची 31 पोती आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या 55 किलो वजनाची 60 पोती जप्त करण्यात आली.

तांदूळ तस्करीसाठी वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी होर्ती  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

RATION RICE TRANSPORT